नगर: काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष यांनी दलित तरुणास शिवीगाळ केली असल्याचा आरोप फुले-शाहू-आंबेडकर चळवळीमधील विविध संघटनांनी केला आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसे निवेदनही जिल्हा पोलीस प्रशासनाला देतानाच काळे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नव्याने वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

राज्य सरकारमधील घटकपक्ष असणाऱ्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नगरमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यातील हल्लेखोर राष्ट्रवादीचे आमदार यांचे समर्थक असल्याचा आरोप करताना जगताप यांचा गुंड असा उल्लेख केला आहे. काळे यांनी जगताप समर्थकांकडून आपल्यालाही धमकावल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर, काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे यांनी उत्तर देताना काळेंवर खंडणीचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता दलित युवकास शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यावर करण्यात आलाय. तसेच त्यांना अटक करण्याची मागणीही केली आहे.

वाचा:

यासंदर्भातील निवेदनही (आठवले गट), आरपीआय (गवई गट), भारतीय लहुजी सेना, संत रोहिदास महाराज सेवा संघ, लहुजी शक्ती सेना, लोकशाही विचार मंच, रामवाडी मित्र मंडळ, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ‘नगर महापालिका अंतर्गत असणाऱ्या पार्किंगची पावती वसूल करणाऱ्या दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करणारा, धमकावणारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत किरण काळे यांना अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी.’

दरम्यान, या निवेदनानंतर नव्याने वाद पेटणार की वेळीच वरिष्ठांकडून हस्तक्षेप करून हा वाद मिटवला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here