कथित व्हायरल ऑडिओमध्ये वरुण गांधी एका बाजूला आहेत तर दुसरीकडे पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या सर्वेश याचा आवाज आहे. अवेळी फोन केल्याने वरुण गांधी फोन करणाऱ्यावर संतापले असल्याचं ऐकलं जाऊ शकतं. ‘मी तुमच्या वडिलांचा नोकर नाही’, असं वरुण गांधी फोन करणाऱ्याला म्हणाले आहेत. वरुण गांधी यांना फोन करणाऱ्या सर्वेश या व्यक्तीच्या घरी पोलिसांनी रात्री छापा टाकला होता. या छाप्यात त्याच्या घरातून अवैध दारू जप्त केले गेली. आरोपी सर्वोश हा घरातून करत होता.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्वेश याला ताब्यात घेत पोलिस स्टेशन सुनगढीच्या असमरोड चौकीत आणलं. पोलिस चौकीत पोहोचल्यावर आरोपी सर्वेश याने खासदार वरुण गांधी यांना मदतीसाठी फोन केला. रात्री दहा वाजेच्या सुमारास फोन केल्याने खासदार वरुण गांधी संतापले आणि त्यांनी सर्वेशला झापलं. यानंतर हा कथित ऑडिओ व्हायरल होतोय.
या कथित व्हायरल ऑडिओबाबत वरुण गांधींकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. यामुळे हा ऑडिओ सत्य आहे की बनावट हे अद्याप स्पष्ट नाही. पण या प्रकरणावरून राजकारण सुरू झालं आहे. ‘मी तुमच्या वडिलांचा नोकर नाही, असं वरुण गांधी नागरिकांना म्हणत आहेत. पण वरुणजी हायकोर्टाने गेल्या आठवड्यात म्हटलंय, ‘सरकार जनतेचे सेवक आहे राज्यकर्ते नव्हे’. पण भांडवलशाही ही भाजपची परंपरा आहे आणि मागास-दलित आपल्यासाठी साप आणि उंदीर आहेत. जनता नक्कीच याचं उत्तर देईल ‘कोणाचा वडिलांचा नोकर आहे?’ असं समाजवादी पक्षाचे नेते सुनील सिंह यादव यांनी ट्विट करून म्हटलंय.
हा कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर वरुण गांधी यांच्या वागण्या विरोधात सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त केलं. पण बहुतेक जण वरुण गांधींच्या समर्थनार्थ पुढेही आले. वरुण गांधी दारू तस्करांना मदत करत नाहीत, असं समर्थकांचं म्हणणं आहे. तर आरोपी सर्वेश याची जामिनावर सुटका झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times