मुंबई: ‘मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित सुरू करण्यात यावी’, अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. लोकलबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे. ( On )

वाचा:

राज्य सरकार प्रक्रियेदरम्यान अनेक सेवांना हिरवा कंदील दाखवत आहे. सरकारच्या परवानगीनंतर रविवारपासून मोनो रेल तर आजपासून पुन्हा एकदा सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच लोकलसेवा नियमित करण्यासही राज्य सरकार परवानगी देईल अशी आशा निर्माण झाली असून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत आज माध्यमांकडे महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

वाचा:

‘मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी’, अशी मागणीच त्यांनी केली. राज्य सरकारने सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यांतरही रेल्वेने तशी परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे मलिक यांनी नमूद केले. एकीकडे रेल्वेमंत्री हे लोकल सेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत पण राज्य सरकार परवानगी देत नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे राज्य सरकारने परवानगी देऊनही महिलांसाठी लोकलची दारे खुली केली जात नाहीत, याचा अर्थ काय घ्यावा?, असा सवालच मलिक यांनी केला.

वाचा:

लोकलच्या बाबतीत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करतानाच नियमित लोकल सेवा सुरू करा. जादा गाड्या सोडा. गर्दी होवू नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करा. गरज भासल्यास महिलांसाठी विशेष लोकल सोडा, अशा अनेक मागण्याही नवाब मलिक यांनी केल्या. राज्य सरकारमधीलच एका मंत्र्याने लोकलबाबत या मगण्या केल्याने लोकलसेवा पूर्ववत होण्यास आता राज्य सरकारची कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

वाचा:

दरम्यान, सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेकडे केली आहे. तसे पत्र सरकारने पश्चिम व मध्य रेल्वेला पाठवले आहे. दुपारी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या मुहर्तावर १७ ऑक्टोबरपासून ही परवानगी मिळावी, अशी सरकारची अपेक्षा होती. मात्र रेल्वेने यावर तातडीने कोणताही निर्णय घेतला नाही. हा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here