वृत्तसंस्था, बेंगळुरू :
कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, यादगीर, रायचूर या चार जिल्ह्यांतील पूर अद्यापही ओसरला नसून, प्रशासनाने सुमारे ३५ हजार पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, जिल्हा पोलिस, जिल्हा प्रशासनातर्फे बचावकार्य अथक सुरू आहे, अशी माहिती सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

कलबुर्गी, विजयपुरा, यादगीर, रायचूर जिल्ह्यांतील सुमारे ९७ गावे पूरबाधित असून, या गावांमधील पुराचा फटका बसलेल्या ३६ हजार २९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी सुमारे १७४ सुरू केली आहेत. महाराष्ट्रात मागील आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीवरील धरणे भरली. परिणामी, या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याचा फटका उत्तर कर्नाटकमधील या चारही जिल्ह्यांना बसला असून, या गावांतील पूर अद्यापही कमी होण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, बेंगळुरू शहर आणि परिसराला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, शहर परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरू येथे ३९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वाचा :

वाचा :

हैदराबादमध्ये पावसाचे एकूण ७० बळी

तेलंगणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात ७० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या ७० जणांमध्ये ३३ जण ग्रेटर येथील आहेत; तर उर्वरित ३० जण हैदराबाद शहर परिसरातील आहेत. हैदराबाद हरातील विविध भागांमध्ये निर्माण झाली होती. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने प्रशासनाने पूरस्थिती हाताळण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिस, प्रशासन आणि आपत्ती निवारण दले चोवीस तास बचातकार्य करीत असल्याची माहिती देण्यात आली. तेलंगणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने मदत दिली असल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here