पंढरपूर तालुक्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी सोमवारी गावागावात दरेकर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी जी गारपीट झाली होती तेव्हा बांधावर जाऊन हेक्टरी २५ व ५० हजार रुपयाच्या मदतीची मागणी ठाकरे करीत होते. आता तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असताना वचन पाळणाऱ्या यांनी वाचन पाळावे व तात्काळ पंचनामे न करता मदत द्यावी असा टोला लगावला. तुमची जबाबदारी आधी पूर्ण करा आणि मग केंद्राकडे बोट दाखवा असे सांगताना, ज्यांच्याकडे मदत मागायची त्यांच्यावर टीका ही दुटप्पी भूमिका जनतेला कळते. हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? केंद्र सरकार त्याची जबाबदारी पूर्ण करणारच आहे पण तुम्ही त्यांचेकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका, असेही दरेकर यांनी राज्य सरकारला सुनावले.
वाचा:
येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला. पूरग्रस्त पाहणी दौरा संपल्यावर दरेकर यांनी कुंभार घाट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपले जुने सहकारी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times