मुंबई: मराठी भाषेच्या वापराबद्दल आग्रही असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे. ( responds to MNS Demand)

मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.

वाचा:

अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. मनसेच्या मागणीची खुद्द बेजॉस यांनी दखल घेतली आहे. मनसेचं शिष्टमंडळ आज मुंबईत येत असल्याचंही चित्रे यांनी म्हटलं आहे. ‘तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं राजसाहेब म्हणतात,’ असंही चित्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

ऑनलाइन कंपन्यांनी स्थानिक भाषेचा वापर करावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अलीकडेच मनसेच्या शिष्टमंडळाने अॅमेझॉन व फ्लिपकार्टच्या बीकेसी येथील कार्यालयांमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम लगेच दिसून आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here