अहमदनगर: करोनाचं संकट अद्याप घोंगावत असतानाच परतीच्या पावसानं राज्यातील पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं राज्य सरकारपुढं आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी पुन्हा एकदा जीएसटीच्या वाट्याची मागणी केली आहे. ‘दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे. ()

अतिवृष्टीमुळं राज्यात झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेते जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. संकट मोठं असल्यानं केंद्र सरकारनं मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर, केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळ जाणार आहे, असं राज्यातील भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या वाट्याच्या जीएसटी परताव्याचा मुद्दा उचलून धरला आहे.

वाचा:

एक ट्वीट करून त्यांनी केंद्र सरकारकडे जीएसटीच्या रकमेची मागणी केली आहे. ‘आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेत आहेच, पण केंद्रानेही #GST चे राज्याचे थकीत २८ हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी,’ असं रोहित यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here