मुंबई: ‘प्रत्येक घटनेकडं शांतपणे पाहणाऱ्या व त्यावर संयमी प्रतिक्रिया देणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचा धक्का वगैरे बसत नाही,’ असं राज्याचे पर्यावरणमंत्री यांनी आज सांगितलं.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरणाईंशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी हे युवा आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते. गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. यावेळी ‘रॅपिड फायर’ फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली.

वाचा:

अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत,’ असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

वाचा:

नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणाचा राग जास्त येतो, असं विचारलं असता आदित्य म्हणाले, ‘राजकारणात जे काही घडतं, तो त्याचा एक भाग असतो. त्याचा राग मनात ठेवायचा नसतो. मी सुद्धा या सगळ्याकडं त्याच दृष्टिकोनातून पाहतो.’

पंकजा आणि खडसे दोघेही जवळचे!

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांपैकी कोण अधिक जवळचं आहे, या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी अत्यंत हुशारीनं उत्तर दिलं. ‘महाविकास आघाडीसाठी सध्या हे दोन्ही नेते जवळचे आहेत,’ असं ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here