म. टा. वृत्तसेवा, मिरा भाईंदर: आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणाची काशिमिरा पोलिसांकडून चौकशी होत असताना एका आरोपीने केल्याची तब्बल वर्षभरानंतर कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.

मुंबईच्या अंधेरी येथील ट्रान्समार्ट या कंपनीकडून मैत्रिण ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एकूण चार क्रेडिट कार्ड मशिन देण्यात आली होती. मैत्रिण कंपनीचे मालक आशीष उकानी व निकिता दोषी यांनी संगनमत करून ट्रान्समार्ट कंपनीच्या क्रेडिट कार्ड मशिनपैकी शोभित कुमार यांच्या कार्डची मर्यादा २९ हजार रुपये असताना बँकेतून १५ लाख ६५ हजार ९०० रुपये काढून घेत ट्रान्समार्ट कंपनीची फसवणूक केली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात १५ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्ह्यातील आरोपी आशीष उकाणी व निकिता दोषी हे सतत ठावठिकाणा बदलत होते. काशिमिरा पोलिसांनी आशीषला अखेल गुजरातमधील सुरत येथे अटक केली. पोलिसांनी त्यास निकिताबाबत माहिती विचारली असता तो सतत वेगवेगळी उत्तरे देत होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक तपास सुरू केला. यात त्याने निकिताची हत्या केल्याचे उघड झाले. गाडी व पैशांवरून भांडण झाल्याने त्याने तिला अमरेली येथे एका विहिरीत ढकलून दिले. यात तिचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आपण निकिताचा मृतदेह एका शेतात पुरून टाकल्याची कबुली त्याने पोलिसांजवळ दिली. आशीष व निकिता यांची ओळख फेसबुकवर झाली होती. यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र दोघांचेही हे दुसरे लग्न होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here