नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी विशेष लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत राज्य सरकार, महापालिका, पोलीस प्रशासन व मुख्य सचिवांनी मिळून चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन रेल्वे सुरू करण्याचे ठरले. राज्य सरकारने १६ ऑक्टोबरला तसे पत्रही रेल्वे प्रशासनाला लिहिले. मात्र, त्यानंतर अचानक रेल्वे प्रशासनानं घूमजाव करत गाड्या सुरू करता येणार नसल्याचे सांगितले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर अचानक दबाव कोणी आणला,’ असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी उपस्थित केला आहे.
वाचा:
‘लोकल सुरू करण्यास असमर्थता व्यक्त करताना रेल्वेनं दिलेली कारणं न पटणारी आहेत. रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग ही गोष्ट अधिकाऱ्यांना आधी माहीत नव्हती का? कोविडच्या नव्यानं जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं पालन व्हायला हवं अशी अटही घालण्यात आली आहे. मात्र, आजही कोविडच्या सर्व निर्देशांचं पालन राज्य सरकारकडून केलं जात आहे. किती पॅसेंजर प्रवास करतील हे राज्य सरकारनं कळवावं, असंही रेल्वेनं म्हटलं आहे. खरंतर हा सर्व डेटा रेल्वेकडे आहे. मुंबईत कुठल्या तासाला किती महिला रेल्वेने प्रवास करतात हे सगळं रेल्वे प्रशासनाला माहीत आहे. असं असताना जो कांगावा केला जातोय त्यामागे भाजपचं राजकारण आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘मुंबईचे असलेले रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याचं उत्तर द्यायला हवं. मुंबईतील महिलांना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी अशी त्यांची इच्छा नाही का? त्यांनी नवरात्रीचीही तमा बाळगलेली नाही. त्यांनी यात राजकारण करू नये,’ असंही सावंत यांनी सुनावलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times