मुंबईः ‘आमचं सरकार असताना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका घेतली होती त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे,’ असा टोला यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जुना व्हिडिओ दाखवत सरकारला याची आठवण करून देत निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ या वाक्याची सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारविरोधात हाच धागा पकडला असून उस्मानबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप शिवसेना सत्तेत असताना अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसान भरपाईसाठी यांनी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजारांची मदत तातडीने देण्याची मागणी केली होती, तोच व्हिडिओ दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना त्याची गतवर्षी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गतवर्षी जी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचं निर्वाहन करण्याची त्यांच्याकडे संधी आहे त्या संधीचा त्यांनी उपयोग करावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे त्या व्हिडिओत

सरकारनं शेतकऱ्यांना केलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुचपुंजी आहे. या मदतीमुळं काहीही होणार नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीनं जाहीर करावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतं. तर, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. सरकारमं जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत कमी आहे. दीड ते दोन लाख कोटी रुपयांची भरपाई गरजेची आहे. पाहणी-आढावा घेतल्यानंतर मिळणारी मदत येईल तेव्हा येईल. पण आता सरकारनं तातडीने मदत करावी, असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते.

राजकारण करायची ही वेळ नाही

ही वेळ राजकारण करायची नाही अधिक संवेदनशील राहायची आहे. सतत केंद्राकडे बोट दाखवणे सुद्धा योग्य नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच. राजकीय भाष्य सोडून शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांना राजकारणात रस नाही, मलाही यात राजकारण आणायचे नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here