उस्मानाबादः योजनेच्या कामांवर कॅगने ओढलेले ताशेरे आणि ठाकरे सरकारने घेतलेला चौकशीचा निर्णयावर माजी मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिला आहे. ‘चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर ते होणार नाही,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘जलयुक्त शिवाराची जी काही चौकशी करायची ती जरुर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेलं नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार ६ लाखांवर कामे झाली आहेत. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होती. स्थानिक पातळीवर यांचे टेंडर निघाले आहेत. एका लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘७०० तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहा लाख कामांमध्ये ७०० तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात. जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा असतो, तो जनते करताच काम करणार आहे,’ असंही ते यावेळी म्हणाले.

‘करोना संपल्यानंतर आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मत नोंदवणार आहे. ते आमच्याकडे आधीपासून आहे देखील. अनेक शेतकऱ्यांनी काय फायदा झाला हे सांगितलं आहे. जलयुक्त शिवारामुळं किती फायदा झाला याचं प्रदर्शन मांडणार आहोत,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here