मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला भाजपचे नेते यांच्या पक्षांतराचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. ( on Thursday)

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातून बाजूला पडत गेले. भूखंड घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. कालांतरानं क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांना सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही डावलण्यात आले. विधान परिषदेतही संधी नाकारली गेली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना स्थान देतानाही खडसेंचा विचार केला गेला नाही. ही शेवटची संधीही हुकल्यानं अखेर खडसेंनी पक्षातरांचा निर्णय घेतला.

वाचा:

जिल्ह्यात सध्या खडसेंच्या पक्षांतराचीच चर्चा आहे. ते राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत यावरून सुरुवातीला तर्कवितर्क मांडले जात होते. मात्र, ते राष्ट्रवादीतच जाणार असून गुरुवारी मुंबईत एका सोहळ्यात ते प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. खडसेंच्या कन्या व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे व इतर सहकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या विश्वासातील लोकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा:

खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. खडसे सध्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसमध्ये आहेत. उद्या मोजक्या कार्यकर्त्यांबरोबर ते मुंबईकडे निघणार आहेत.

…तर जिल्हा बँक व दूध फेडरेशन भाजपकडून जाणार

खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आहेत. तर खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत. ‘महानंद’च्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहत आहेत. जळगाव जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आहे. खडसेंनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपच्या हातून ही संस्थाने जातील, असा अंदाज आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here