मुंबईः ‘मुख्यमंत्री हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यांनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर असताना दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामनाही रंगला होता. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांना ‘ काय थिल्लरपणा लावलाय’ अशी शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तर, जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केलाय? असा सवाल फडणवीसांना केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी अशा पद्धतीनं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केलाय? हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येकवेळीच संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असे शब्द वापरणे चुकीचं आहे,’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत. इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका’, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकार चालवायला दम लागतो. केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असे फडणवीस म्हणाले होते. यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here