पालघर: इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू करून त्याद्वारे मुलींना पाठवणाऱ्या तरुणाला सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी तरुणाने बनावट आयडीद्वारे दोनशेहून अधिक मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येथील १८ वर्षीय तरुणीने १७ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ जुलै रोजी रात्री अनोळखी व्यक्तीने तिचा इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून वेगळ्या नावाने अकाउंट तयार करून तरुणीला अश्लील मेसेज केले, असे तिने तक्रारीत म्हटले होते. आरोपीने पीडित तरुणीचा फोटो मॉर्फ करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकीही दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

पालघर सायबर सेलच्या पथकाने तपास केला असता, बनावट अकाउंटची माहिती मिळाली. त्यानंतर केळवा पोलीस ठाण्याचे एक पथक साताऱ्याला पोहोचले. त्यांनी आरोपी सोहन डेरे याला अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here