मुंबई: डीएचएफएल प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने () अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीची २२ कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात मुंबईतील एक हॉटेल, एक सिनेमागृह तसेच पाचगणी येथील मालमत्तेचा समावेश आहे.

पीएमएलए अंतर्गत मालमत्ता जप्तीच्या दिलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने मंगळवारी दिली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील टॉकीज (सिनेमागृह) आणि एका हॉटेलचा समावेश आहे. तसेच फार्म हाऊस, दोन बंगल्यांसह पाचगणीमधील साडेतीन एकर जमिनीचा समावेश आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. जप्त केलेल्या मालमत्तेची अंदाजे किंमत २२.४२ कोटी रुपये आहे. त्यात सात बँक खात्यांमधील ठेवींचाही समावेश आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि कुख्यात गुंड इकबाल मिर्चीचा लंडनमध्ये २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये त्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची विदेशातील जवळपास २०० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. जप्त केलेल्या मालमत्तेत मिर्चीच्या कुटुंबातील सदस्यांच्या १५ व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता आहेत. वाधवान बंधूच्या मालकीच्या दुबईतील कंपनीने ही संपत्ती मिर्ची कुटुंबाला हस्तांतरित केली होती. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असलेला इकबाल मिर्ची याने देश-विदेशात अचल संपत्ती आणि व्यावसायिक मालमत्ता मिळवली होती. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी त्याने मालमत्ता खरेदी केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here