हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भरकटून आला होता आणि निश्चित केलेल्या शिष्टाचारानुसार आवश्यक ती कारवाई केल्यानंतर त्याला चीनला परत पाठवण्यात येईलस असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. या चीनी सैनिकाला वैद्यकीय मदत ( यात ऑक्सिजन, जेवण, गरम कपडे अशा वस्तूंचा समावेश) देखील दिली गेली आहे. उंचीवर असलेल्या विपरित हवामानात या सैनिकाला संरक्षण मिळावे हा याचा उद्देश आहे.
चीनी सैनिकांनी या सैनिकाबाबत भारताकडून माहिती घेतली असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. या सैनिकाला चुशुल-मोल्डो मिटिंग पॉइंटहून परत पाठवले जाईल, असे भारताने सांगितले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या सैनिकाजवळ काही कागदपत्र मिळाली असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. चीनी लष्कराने या चीनी सैनिकाला सोडण्याबाबत भारतीय लष्कराकडे विनंती केली असल्याचेही भारतीय लष्कराने सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य एप्रिल-मे पासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंकडे तणाव कायम आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनारपट्टी, त्याच प्रमाणे देपसांगच्या मैदानी प्रदेशाबाबतदेखील दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. सीमेवर दोन्ही देशांकडून सैनिक मोठ्या संख्येने तैनात आहेत. तणावाची ही परिस्थिती पाहता एखाद्या चीनी सैनिकाचे अनवधानाने भारतीय सीमेत प्रवेश करणे ही एक मोठी घटना असल्याचे बोलले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times