अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी हे युवा आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते. गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी आपल्या खास स्टाइलनं गुप्ते यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
वाचा:
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाबद्दलचा अजेंडा रोहित यांनी यावेळी मांडला. ‘मी नगर जिल्ह्यातला आमदार आहे. त्यामुळं माझं प्रेम संपूर्ण जिल्ह्यावर आहे. त्यामुळं जास्त प्रेम संगमनेरवर की प्रवरानगरवर, असा प्रश्नच येत नाही. प्रामाणिकपणं काम करत राहणार,’ असं ते म्हणाले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर काम करणं सोपं आहे. हे आपल्यातील लोक वाटतात,’ असंही त्यांनी सांगितलं.
वाचा:
…म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री
‘महाविकास आघाडीचे मन मोठे होते म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. भाजपचं मन तितकं मोठं नव्हतं,’ असा चिमटा रोहित पवार यांनी यावेळी काढला.
हरायचं नाही हे आजोबांकडून शिकलो!
‘परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी लढत राहायचं. हरायचं नाही, हे मी पवार साहेबांकडून (आजोबा) शिकलो. अनेकांना वाटलं होतं पवार साहेब आता रिटायर होतील. पण रिटायर होणार नाही हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. ते मला खूप महत्त्वाचं वाटतं,’ असं रोहित म्हणाले.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times