नीतीश कुमार ही पहिली पसंती
लोकनीती-सीएसडीएसच्या या जनमत चाचणीत मुख्यमंत्री म्हणून लोकांनी नीतीश कुमार यांना पहिली पसंती दिली आहे. त्यांना ३१ टक्को लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. ते प्रथम स्थानी आहेत. तर, तेजस्वी यादव यांना २७ टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपली पसंती दर्शवली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्या स्थानी आहेत. तर तिसऱ्या स्थानी आहेत लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान. त्यांना ५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. सुशील मोदी यांना ४ टक्के लोकांनी आपली पसंती दिली असून ते चौथ्या स्थानी आहेत.
या जनमत चाचणीत ५२ टक्के लोक नितीश कुमार सरकारच्या कामामुळे संतुष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे. तर ४४ लोक नीतीश कुमार सरकारवर नाराजही आहेत. तर, केंद्रातील मोदी सरकारच्या कामामुळे ६१ टक्के लोक संतुष्ट असून ३५ टक्के लोकांनी आपण असंतुष्ट असल्याचे म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केव्हा घेतली गेली जनमत चाचणी?
ही जनमत चाचणी १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली. यात ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के महिला मतदारांची मते जाणून घेण्यात आली. या जनमत चाचणीत ग्रामीण भागातील ९० टक्के लोकांची मते जाणून घेण्यात आली, तर शहरातील १० टक्के लोकांची मते आजमावण्यात आली. या चाचणीत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश होता.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times