तेजस्वी यादव यांच्या या सभेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यावेळी तेजस्वी यादव हे व्यासपीठावर बसले होते आणि आपल्या कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. त्याचवेळी एकाने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने गेली. त्यांना ती लागली नाही. पण यानंतर सभेत गोंधळ उडाला.
दोनदा भिरकावली चप्पल
प्रचारसभेसाठी तेजस्वी यादव हे व्यासपीठावर येऊन बसले. यानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांना काही सूचना देत होते. यादरम्यान त्याच्यांवर चप्पल भिरकण्यात आली. यावेळी तेजस्वी यादव यांचे लक्ष दुसरीकडे होते आणि ते बचावले. चप्पल त्यांच्या बाजूने जाऊन मागे पडली. पण त्या व्यक्तीने आणखी चप्पल त्यांच्या दिशेने भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या अंगावर येऊन पडली. या घटनेनंतर त्या दिव्यांग तरुणाला समजावून शांत करण्यात आलं.
एका दिव्यांग व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल भिरकावल्याचं बोललं जातंय. या प्रकाराने व्यासपीठावर बसलेले नेते आणि तेजस्वी यादव हे स्तब्ध झाले. पण तेजस्वी यादव यांनी या घटनेकडे दुर्लक्ष करत आपले आपले भाषण केले.
तेजस्वी यादव यांनी औरंगाबाद जिल्ह्यात तीन प्रचारसभा घेतल्या. भटबांडी, रफीगंज आणि कुतुंबा येथे या सभा झाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times