मुंबई: मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात चॅनेल्सच्या वतीने ग्राहक आणि साथीदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक केली. दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठवर पोहचली आहे. दरम्यान, टीव्हीच्या तिघांना बुधवारी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नव्याने समन्स जारी केला आहे. ( Latest Updates )

वाचा:

टेलिव्हीजन क्षेत्रातील सर्वात मोठा उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवले आहे. याआधी सहा जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी हंसाचे माजी कर्मचारी असलेल्या रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा या दोघांना अटक केली. सीआययु, युनिट ९ आणि प्रॉपर्टी सेलच्या विशेष पथकाने वरळी येथून रामजीला ताब्यात घेतले. रामजी हा हंसाचा माजी कर्मचारी होता. २०१३ ते २०१५ या काळात तो रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कामाला होता. तर दिनेश विश्वकर्माला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

वाचा:

दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक , सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम आणि डिस्ट्रिब्युटरचे प्रमुख घनश्याम सिंग यांची चौकशी केली जाणार असून गुरुवारी रिपब्लिकचे टीव्हीच्या सीईओ यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here