नवी दिल्ली:
सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींच्या फाशीची तारीख अखेर ठरली. १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली हायकोर्टाने जारी केले आहे. या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. मुकेश सिंह याच्या या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पतियाळा हाऊस कोर्टाने म्हटले होते की या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. त्यामुळे शुक्रवारी तिहार तुरुंग प्रशासनाला स्टेटस रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

नेमकं काय घडलं होतं?

निमवैद्यकीय शाखेत शिकणारी २३ वर्षीय निर्भया हिच्यावर १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यात जबर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांनी भर थंडीत तिला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here