मुंबई: आणि एमएमआर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जामंत्री डॉ. यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. या प्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही समिती सहा सदस्यीय असून या समितीला शनिवरपर्यंत अहवाल द्यायला सांगण्यात आले आहे. ( On )

वाचा:

मुंबईत भविष्यात असा वीजपुरवठा ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेची नवी डिझाइन तयार करा अशी महत्त्वपूर्ण सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. ऊर्जा मंत्री राऊत यांनी आज प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्यावर सखोल चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक उपस्थित होते. विभागातर्फे या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून शनिवारपर्यंत आम्ही आपला अहवाल सादर करू असे महापारेषणच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर बोलताना मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

वाचा:

१९८१ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आयलँडिंग यंत्रणा ही मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सोयीसाठी उभारण्यात आली का?, १९८१च्या तुलनेत आज लोकसंख्या वाढली आहे, तंत्रज्ञान बदलले आहे आणि वीज निर्मितीही वाढली आहे. मग या यंत्रणेत गेल्या ४० वर्षांत काय बदल केले गेले? जगातील प्रमुख महानगरामध्ये आयलँडिंग यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो? याचा आजवर तुम्ही काही अभ्यास केला का? हा प्रश्न लगेच उदभवू नये म्हणून आणि पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यासाठी तुम्ही कोणत्या योजना आखल्या?, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे अंतर्गत चौकशी अहवालात शनिवारपर्यंत मला हवी आहेत आणि गुरुवारी आपण यावर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करु, असेही ते म्हणाले. “तुम्ही जबाबदारी फिक्स करा नाहीतर मी जबाबदारी फिक्स करून कारवाई करेन,”असेही राऊत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

नेमकं कोण खोटं बोलतंय?

राज्यात वीज पारेषण क्षेत्रात ‘एसएलडीसी’ची (State Load Dispatching Centre) भूमिका महत्त्वाची आहे. “या केंद्राने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का?, टाटा कंपनी म्हणतेय की त्यांना वीज पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असल्याने एसएलडीसीने आयलँडिंग करण्याची पूर्वसूचना त्यांना दिली नाही आणि एसएलडीसी म्हणतेय की त्यानी आधीच कळविले होते. त्यामुळे नेमकं कोण खोटं बोलतंय हे तपासावे लागेल. ज्या अधिकाऱ्याने टाटाला एसएमएस पाठवून कळविले त्याचा मोबाइल मला बघायचा आहे. त्याने नेमका किती वाजता एसएमएस पाठविला हे मी पाहणार आहे, असे राऊत यांनी स्पष्टच शब्दांत सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here