हडपसर, कोंढवा, मध्ये पावलाला पहिल्यांदा सुरुवात झाली आणि अर्ध्या तासात शहराच्या सर्वच भागात जोराचा पाऊस पडला. ( Maharashtra Rains Latest Updates )
वाचा:
मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरातील गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साठले होते. रात्री उशिरापर्यंत सरी बरसत राहिल्या. परतीचा पाऊस, ऑक्टोबर हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना ऑक्टोबरच्या पावसाने धडकी भरवली आहे. शहरालगतच्या घाट माथ्यावर आणि जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
वाचा:
बळीराजा धास्तावला
कोल्हापूर: जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. यामुळे भात, सोयाबीनची कापणी व मळणी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसाने आठ दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती. भात, सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. शेतात असलेला भात, सोयाबीन कुजत असून मळणीसाठी काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत. आणखी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास ही पिके पूर्णपणे हातातून जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times