पुणे: रुग्णांना ‘ ’ अंतर्गत मिळणारे लाभ न देणाऱ्या सहा रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी डॉ. यांनी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे केली आहे. या रुग्णालयांनी रुग्णांवर केलेल्या उपचारांची समितीकडून चौकशी करण्यात येणार असून, लाभार्थी रुग्णांकडून बिलाची रक्कम घेतल्याचे आढळून आल्यास रुग्णालयांकडून संबंधित रक्कम वसूल केली जाणार आहे. ( On )

वाचा:

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
याबाबत ते म्हणाले, ‘या योजनेचा लाभ न देणाऱ्या सहा रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये पवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, लांघे हॉस्पिटल, भोसरीतील लाइफलाइन हॉस्पिटल, अॅकॉर्ड हॉस्पिटल, चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटल, देसाई अॅक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून, त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी असणार आहेत. या रुग्णालयांनी लाभार्थी रुग्णांकडून बिलाची रक्कम घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रक्कम वसूल करण्यात येणार आहे.’

वाचा:

‘या रुग्णालयांनी किती लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्यक होते, याचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेचा लाभ रुग्णांना मिळण्यासाठी ‘ ‘चे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. समाजामध्ये डॉक्टरांना मानाचे स्थान असल्याने त्यांनी सेवाभावी वृत्तीतून आरोग्य सेवा दिली पाहिजे’ असेही त्यांनी सांगितले. ‘ बाधित आणि अन्य रुग्णांवर या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी आलेल्या खर्चाची रक्कम राज्य सरकारकडून रुग्णालयांना दिली जाते. काही रुग्णालयांकडून या योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित रुग्णालयांची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here