पाटणाः विधानसभा निवडणुकीपूर्वी ( ) बिहारच्या राजकारणाचे ३ सर्वात महत्वाचे चेहरे मंगळवारी एकाच ठिकाणी दिसले. पटणातील एलजेपी कार्यालयात रामविलास पासवान यांच्या श्रद्धाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी मुख्यमंत्री ( ) संध्याकाळी ५.१५ वाजता आले. यावेळी चिराग ( ) हे त्यांच्या पाया पडले. पण त्या दोघांमध्ये औपचारिक संभाषणही झालं नाही. नितीश आणि चिराग दोघंही सोबत शांतपणे बसले होते. यानंतर १० मिनिटानी ( ) आले, तेही त्यांच्यासोबत बसले. चिराग हे नितीश यांचे पाया पडले. पण त्यांनी मन मोकळं केलं ते तेजस्वी यांच्याकडे. यादरम्यान, फोटोग्राफरने बिहारच्या राजकारणातील तीन दिग्गजांची फोटो काढली. चिराग आणि तेजस्वी यांच्या काय चर्चा झाली हे मात्र कुणाला कळू शकलं नाही. पण चर्चा झाली हे नक्की. हळू आवाजात तेजस्वी यांनी अनेकदा चिराग यांच मन हलकं केलं.

फोटोमुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट

या फोटोमुळे बिहारमधील विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट केलं आहे. यंदा बिहारमधील सत्तेची गुरुकिल्ली या तिघांपैकी कोणा एकाकडे असणार आहे. चिराग यांनी नितीशकुमार यांच्या सात-कलमी योजनेवर अनेकदा टीका केली आहे. दुसरीकडे, यावर नितीशकुमार यांनी काहीही प्रत्युत्तर दिलेलं नाही. हा देखील रणनीतीचा एक भाग मानला जात आहे.

तेजस्वी यांचे संपूर्ण राजकाराणात मौन धारणं करणं हे निवडणुकीनंतरच्या युतीच्या समीकरणाडे लक्ष वेधणारं आहे. नितीश आणि लालू प्रसाद यादव या दोघांचे रामविलास पासवान यांच्याशी जवळचे संबंध होते. आणि राजकीय विरोध असूनही चिराग यांनी नितीशकुमार आणि तेजस्वी यांना निमंत्रण दिलं.

सर्व ३८ जिल्ह्यांत होणार श्रद्धांजली सभा

श्रद्धाच्या निमित्ताने चिराग यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुखांना कलश देऊन त्यांना आपापल्या जिल्ह्यात श्रद्धांजली सभा करण्यास सांगितलं आहे. वडिलांचं प्रेम आणि विश्वास प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांवर होता, म्हणूनच त्यांच्या अस्थी सर्व जिल्ह्यात गेल्या पाहिजे आणि नागरिक त्यांचं दर्शन घेऊ शकतील, असं यांनी सांगितलं.

बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट

श्रद्ध आणि श्रद्धांजली सभेत एलजेपी कार्यालयात दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे समर्थक जमले होते. चिराग यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ दिसूनआली. यावेळी “बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट” ची मोठी होर्डिंग्जही लावण्यात आलेली होती. “ते लढताहेत आमच्यावर राज्य करण्यासाठी आणि आम्ही लढतोय बिहारवर गर्व करण्यासाठी” अशी घोषवाक्य एलजेपीच्या होर्डिंग्जवर दिसून आली.

सुशीलकुमार मोदी पोहोचले नाहीत

उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी श्रद्धांजली सभेत उपस्थित नव्हते. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले. एलजेपीचे नेते खासदार प्रिन्स राज श्रद्धाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घरी आले होते. पण प्रकृती बिघडल्याने मी त्यात सहभागी होऊ शकलो नाही, असं मोदींनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here