म. टा. प्रतिनिधी, नगरः करोना सारख्या आजारासोबत झुंज देत असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला मानसिक आधार देण्यासाठी मंत्री यांचे भाऊ थेट एका खासगी रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी त्या रुग्णाची भेट घेत त्याच्यासोबत संवादही साधला. दरम्यान या प्रकाराची नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

करोनाची धास्तीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. एखाद्याला सर्दी, खोकला असला तरी त्याच्याजवळ जाण्यासाठी अनेकांना भिती वाटते. ग्रामीण भागात करोना म्हटलं तरी अनेकांना भिती वाटते. हा आजार झाल्यानंतर काही रुग्ण हे मानसिकदृष्ट्या खचतात देखील. मात्र, मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी थेट रुग्णालयातच जाऊन करोना झालेल्या आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली आहे.

‘मला लवकर बरा होऊन तू घरी आलेला पाहिजे’, ‘किती दिवसात बरा होऊन येशील’, असा संवादही त्यांनी संबंधित बाधित रुग्णासोबत साधला. तसेच, ‘लवकर ये मी तुझी वाट पाहतोय’, असे सांगत संबंधित रुग्णाला मानसिक आधार देण्याचे कामही त्यांनी केले. याबाबत प्रशांत गडाख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘करोना हा सर्वांसाठी नवीन आजार आहे. या आजाराच्या मुळापर्यंत कोणी गेले नाही. मी आतापर्यंत अनेक रुग्णांना भेटलो असून त्यामधून माझी भिती दूर झाली आहे. मला यामधून संदेश एवढाच द्यायचा आहे की, करोना रुग्णाला मानसिक आधार देणे हे खुप गरजेचे असते. कारण मानसिक आधारातून खुप ऊर्जा संबंधित रुग्णाला मिळत असते. सायन्स सोबत मानसिक आधार गरजेचा आहे, नाहीतर माणुस खचून जाऊ शकतो. करोना बाधितांवर उपचार करण्याचे डॉक्टर हे काम करीत आहेतच. तर आपण देखील इतर आर्थिक मदत करणे व मानसिक आधार देण्याचे काम करू शकतो.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here