नंदुरबार: येथील गावाजवळ एक दरीत प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत, तर ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य तातडीनं हाती घेण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस ही खासगी असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृत व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती नंदुरबारचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here