म. टा. प्रतिनिधी, पुणे

कालावधीत आवश्यक असणारे मास्क आता रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. सुमारे १९ ते ४९ रुपयांपर्यंत तसेच दुपदरी आणि तीन पदरी मास्क तीन ते चार रुपयांना मिळणार आहे. योग्य किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात साथरोग कायदा लागू असेपर्यंत ही अधिकतम विक्री मूल्य मर्यादा लागू राहणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात करोनाची साथ नियंत्रित ठेवण्यासाठी मास्क , सुरक्षित वावर आणि सॅनिटायझर यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मास्कच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेत समिती स्थापन केली होती. त्या समितीने मास्क, तसेच सॅनिटायझर्सच्या किमतीबाबत अभ्यास केला होता.

दर निश्चित करण्यापूर्वी समितीने उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून उत्पादक, पुरवठादार व वितरक यांचे उत्पादन क्षेत्र, कार्यालय, गोदामांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन लेखापरीक्षकांच्या मदतीने किंमत निश्चित केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मास्कची ठरविलेली ही अधिकतम विक्री मूल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक किंवा किरकोळ विक्रेत्यांना लागू राहील, असे आरोग्य विभागाने सांगितले. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेत्यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे, असे ठरविण्यत आले आहेत. या संदर्भात काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here