वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

बिहारमध्ये प्रत्येक निवडणुकीत स्वच्छ प्रशासन व गुन्हेगारीमुक्त सरकारची ग्वाही देणाऱ्या राजकीय पक्षांनी यंदाही त्यास तिलांजली दिली आहे. केवळ पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या १०६४ पैकी तब्बल ३० टक्के उमेदवारांवर खून, खंडणी, बलात्कार अशा गंभीर आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ७४ विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने याबाबतचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. यानुसार एकूण उमेदवारांपैकी २४४ (२३ टक्के) जणांविरोधात गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ज्या प्रकरणांमध्ये जामीन मिळू शकत नाही, असे हे गुन्हे आहेत व ते सिद्ध झाल्यास पाच वर्षांहून अधिक शिक्षा होऊ शकते. ३२८ (३१ टक्के) उमेदवारांनी निवडणूक अर्जात त्यांच्याविरुद्धच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली आहे. याशिवाय निवडणूक रिंगणातील ३७५ (३५ टक्के) उमेदवार कोट्यधीश असून, पाच जणांकडील मालमत्तेचे मूल्य शून्य रुपये आहे.

वाचा : वाचा :

राष्ट्रीय जनता दलाच्या ४१पैकी ३० उमेदवारांविरुद्ध गुन्हे नोंद असून, त्यापैकी २२ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या २९पैकी २१ उमेदवारांविरोधात गुन्हे असून, गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले १३ जण आहेत. लोक जनशक्ती पार्टीच्या ४१पैकी २४ उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल असून, त्यापैकी २० जणांविरुद्धच्या गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर आहे. तर यांचा जेडीयू पक्षही यापासून मुक्त नसून, ३५पैकी १५ जणांविरुद्ध गुन्हे आहेत. काँग्रेसच्या २१पैकी १२ जणांविरुद्धही गुन्हे दाखल आहेत.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here