अलीगढ, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या चर्चित हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दलित तरुणीच्या ‘फॉरेन्सिक अहवाला’वर (FSL Report) प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अलीगढच्या दोन डॉक्टरांवर नोकरी गमावण्याची वेळ आलीय. अलीगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधून डॉ. तसंच त्यांचे सहकारी डॉ. यांना करण्यात आलंय.

हाथरस घटनेच्या वेळी डॉ. मलिक याच रुग्णालयातील एमर्जन्सी अॅन्ड ट्रॉमा सेंटरमध्ये मेडिकल अधिकारी पदावर तैनात होते. हाथरस प्रकरणातील पीडित मुलीचा एमएलसी (Medico-legal case) अहवाल याच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. तर डॉ. हक यांनी पीडितेच्या ” अहवालावर स्वाक्षरी केली होती.

हाथरस प्रकरणात विचारले प्रश्न

फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा केला होता. यावर, डॉ. मलिक यांनी फॉरेन्सिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. फॉरेन्सिक अहवालासाठी नमुने बलात्कारानंतर ११ दिवसांनी घेण्यात आले होते. सरकारी गाईडलाईन्सनुसार, बलात्कारानंतर ९६ तासांच्या आत घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणीत बलात्काराची पुष्टी होऊ शकते, असं डॉ. मलिक यांचं म्हणणं होतं.

वाचा : वाचा :

यानंतर, मंगळवारी (२० ऑक्टोबर) त्याांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. शाह झैदी यांनी एका पत्राद्वारे तत्काळ प्रभावानं डॉ. मलिक यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची सूचना दिली. डॉ. अझिम मलिक यांनी केलेल्या आरोपानुसार, हाथरस प्रकरणात मीडियाशी बोलण्यासाठी आपल्याला शिक्षा देण्यात आलीय.

दुसरीकडे, अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डॉ. मलिक आणि डॉ. ओबेद यांच्या निलंबनाचा आणि हाथरस प्रकरणाचा काही एक संबंध नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर आजारी असल्यानं या दोन्ही डॉक्टरांना ‘लिव्ह व्हॅकेन्सी’वर घेण्यात आलं होतं. आता त्यांच्या सेवेची गरज नसल्यानं त्यांना नोकरीतून काढण्यात आलंय.

हाथरस गँगरेप प्रकरण

गेल्या महिन्यात १४ सप्टेंबर रोजी हाथरसच्या एका गावात २० वर्षीय दलित तरुणीवर गावातील काही उच्चवर्गीय चार तरुणांनी कथितरित्या सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला क्रूर मारहाणही करण्यात आली होती. पीडितेच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होत्या. तिच्या पाठीच्या मणक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. दिल्लीच्या सफरदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाकडून अर्ध्यारात्रीच पीडितेचा मृतदेह कुटुंबाच्या उपस्थितीशिवाय जाळण्यात आला. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here