प्रयागराजच्या यमुनापार परिसरात मांडा येथील खुरमा गावातील तरुणी २९ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गावातील विजय शंकर या तरुणाने तिचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यमुनापार येथील पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांच्या माहितीनुसार, पोलीस तरुणीचा शोध घेत असतानाच, तिचा मृतदेह गुजरातच्या येथील वापीमध्ये मिळाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तिच्या कुटुंबीयांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. तरुणीची गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह फेकून दिले होते.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोपी विजय शंकर याला मेजा येथून अटक केली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, गुन्ह्याची कबुली दिली. प्रेयसीला गुजरातला नेले. तिथे ओळखपत्र नसल्याने कोणतेही काम अथवा राहण्यासाठी जागा मिळाली नाही. दुसरीकडे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो घाबरला. त्याने तरुणीला घरी परतण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याने तिची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times