सुरेश कुलकर्णी ।
जालना

‘तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे मदत मागणाऱ्या मुख्यमंत्री यांची खिल्ली उडवली आहे.

वाचा:

ते जालन्यात बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी अशाच परिस्थितीत दौरा केला. तेव्हा पंचनामे बाजूला ठेवून मदतीची मागणी केली होती, तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. ठाकरे हे विसरले नसावेत. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झाला. झाली. मग एका एका शेतकऱ्याचे पंचनामे करत बसायला कुठे वेळ घालवता. सरसकट पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा, अशी मागणी दानवे यांनी केली.

वाचा:

तुम्ही सतत केंद्राडे बोट दाखवता. तुम्ही चोरून लग्न केलं, आता बापाला संसार चालवायला सांगता? मग कशाला चोरून लग्न केलं? असे दानवे म्हणाले. तरी केंद्र सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही केंद्र सरकारला कळवा, केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here