(नाशिक): त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मोठे बंधू शेखर यांच्या बाराव्याचे श्राद्ध विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना फोन आला. त्यामुळे ते अहिल्या धरणाकडे गेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या गोणदके नावाच्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर सुरीने वार करून हत्या केली. धनंजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर आरोपी हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here