सांगलीः ‘कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करु शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही,’ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( on )

यांनी आज भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपतील अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास वेळोवेळी भाजपतून व्यक्त केला जात होता. प्रवीण दरेकर यांनीही खडसेंच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘विचारधारा रुजवणाऱ्या नेत्यांनी पक्ष सोडणे योग्य नाही’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘राजकारणात तुम्ही समाधानी नसला तर मरेपर्यंत तुमचं कोण समाधान करु शकत नाही. तुम्ही कायम नाराजचं राहता. कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करू शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही. भाजपने अनेक महत्त्वाची आणि मोठी खाती खडसेंना दिली होती. भाजपने त्यांना भरपूर दिले होते,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here