मुंबई- प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी आपलं कौतुक करावं, आपल्या कामाची दाद द्यावी असं वाटत असतं. पण या गोष्टीता अतिरेक झाला तरी त्याचा त्रास होतो. नेमकी असंच काहीसं अभिनेता संग्राम समेळच्या बाबतीत घडत आहे. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता संग्राम समेळ अडचणीत सापडला आहे. त्याला एक चाहती सतत मेसेज करत असून, त्यामुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याने स्वतःचा त्रास फेसबुक लाइव्ह करून शेअर केला.

संग्रामनं त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संग्रामने सांगितलं की, स्वीटी सातारकर नामक तरुणी संग्रामला सतत मेसेज पाठवत आहे. दिवसभरात तिच्याकडून येणाऱ्या तीनशे ते चारशे मेसेजसमुळे तो आता पुरता हैराण झाला आहे. तिच्या अशा सततच्या मेसेज करण्यामुळे त्याचं वैवाहिक आयुष्यही अस्वस्थ झआलं आहे.

कोणासोबत अशा प्रकारे वागणं योग्य नाही असं संग्रामने व्हिडिओत स्पष्ट केलं.यासोबतच तिच्या परिचयाचं कोणी असेल किंवा तिच्या आई- वडिलांना जर कोणी ओळखत असेल तर त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याची विनंती संग्रामने यावेळी फेसबुक लाइव्हमध्ये केली.

संग्राम समेळच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सोनी मराठीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत काम करत आहे. याशिवाय कुसूम मनोहर लेले या नाटकामध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या नाटकात त्याच्यासोबत शशांक केतकर, तसेच संग्रामची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्याही मुख्य भूमिका आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या विक्की वेलिंगकर सिनेमातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here