म.टा. प्रतिनिधी, नगर: ज्येष्ठ नेते यांच्या नियोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाचे पक्षातून स्वागत जोरदार स्वागत होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांची रांग लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते यांनी भाजपला उद्देशून एक भाषण केले होते. पक्षांतरासंबंधी विधान करताना हे शब्द लक्षात ठेवा, असेही पवारांनी बजावले होते. आज ‘सत्तेचा ताम्रपट’ या शब्दाची आठवण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा करून दिली आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी राशीन (ता. कर्जत) येथे अजित पवार यांची सभा झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘आज सत्ता जशी तुमच्याकडे आहे; उद्या आमच्याकडे असेल. कोणी जन्मतः ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. आज जसे तुमच्याकडे नेते लोक येत आहेत, तसे उद्या आमच्याकडेसुद्धा येतील. त्यामुळं जास्त मिजाज नका करू. लक्षात ठेवा हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. उद्या या अजित पवारचे शब्द लक्षात असतील तुमच्या.’

सत्तेचा ताम्रपट हा शब्द पवार यांनी यापूर्वी अनेक भाषणांत वापरला. निवडणुकीपूर्वी काढलेल्या संघर्ष यात्रेत ठिकठिकाणी हा उल्लेख त्यांनी केला. पुढे निवडणूक प्रचार सभांमधूनही त्यांनी याचा वापर करीत भाजपवर टीका केली. तर भाजपकडूनही याच शब्दाच्या अधारे पवार यांच्यावर पलटवारही करण्यात आला होता.
मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या. नाट्यमय घडामोडीनंतर जादा जागा मिळवूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. स्वत: अजित पवार यांचाही पहाटेचा शपथविधी गाजला. त्यानंतर त्यावरूनही भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना त्यांचा सत्तेच्या ताम्रपट या विधानाची आठवण करून देत टीकाही केली होती.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकदा भाजपचे आमदार संपर्कात असल्याच्या चर्चा होत राहिल्या. आता खडसे यांच्या रुपाने भाजपमधील मोठा नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून त्यांचे स्वागत होत आहे. हे स्वागत करीत असताना याच विषयावर अजित पवार यांनी दिलेल्या जुन्या भाषणाची आठवण काढली जात आहे. पवार यांच्या भाषणातील मुद्दा व्हायरल करून खडसे यांच्या स्वागताच्या पोस्ट केल्या जात आहेत. #खडसेयांचेदिलसे_स्वागत असा ट्रेंडचा चालविला जात आहे. यासबंधी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्ट नेत्यांकडूनही शेअर केल्या जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here