अश्विनी सोपान कांबळे, निरंजन सागर म्हकाळे, राहुल श्रीनिवास रागीर, रोहित दत्तात्रय क्षीरसागर, महेंद्र मदनलाल सराफ, प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते, रोहीत ऊर्फ नाळा कमलाकर कानळे, संदीप ऊर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन मनोहर वाले, चंद्रशेखर रामदास वाघेल अशी या प्रकरणात ‘मोक्का’ लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र दीपक मारटकर यांची २ ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या झाली होती. रात्री जेवण करून मारटकर हे घराबाहेर पडले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर आणि छातीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती.
कोथरूडमध्ये ४० लाखांचा गुटखा जप्त
शहरासह संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही, सध्या अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात चारचाकी वाहनातून विक्रीसाठी आणलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून, कोथरूड पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे ४० लाख रुपये आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times