मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४१ अंकांनी वधरून ११९३७ अंकांवर बंद झाला. सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांक वधारला आहे.

आज दिवसभरात निर्देशनाकांनी मोठी उलथापालथ अनुभवली. आशियातील सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेतली होती. करोना संकटात देखील काही कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधक विनोद नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की युरोपात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तेथील भांडवली बाजारात दबाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद येत्या काही सत्रांमध्ये भारतीय बाजारांवर दिसून येतील.

आजच्या सत्रात बँकिंग, मेटल आणि रियल्टी निर्देशांकात मोठी वाढ झाली. निफ्टीवर पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, टाटा स्टील या शेअरमध्ये वाढ झाली. ब्रिटानिया, टीसीएस आणि एसबीआय लाईफ इंश्युरन्स हे शेअर घसरले. निफ्टी ११९०० अंकावर स्थिरावला आहे. बाजारातील तेजीचा माहौल पाहता नजीकच्या काळात निफ्टीत वृद्धी होईल, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक नागराज शेट्टी यांनी व्यक्त केला. निफ्टी पुन्हा १२०२५ या स्तरापर्यंत जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

बँकिंग क्षेत्रात आज एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक या शेअरमध्ये वाढ झाली. त्याशिवाय वेदांता, अदानी ट्रान्समिशन, आरती सरफॅक्टंट, एसीसी, एशियन पेंट, बर्जर पेंट्स, हॅवेल्स या शेअरने वर्षभरातील उच्चांक गाठला. बाजारात आज २२७ शेअरला अप्पर सर्किट लागले.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पाच महिन्यांमध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थींच्या संख्येत जवळपास २० लाखांची वाढ झाली आहे. त्यापैकी तब्बल १० लाख ६० हजार रोजगार संधी आॅगस्टमध्ये उपलब्ध झाल्याचा दावा ईपीएफओने केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here