मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई येथील विभागीय हवामान खात्यानं तसं ट्विट केलं आहे.

आज ३ ते ४ तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. त्यानंतर हीच स्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

परतीच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, सोलापूर भागांत तडाखा दिला होता. या पावसात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं आहे. तर, काही भागांत वीज कोसळल्यामुळं नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळं आताही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here