मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ५८ हजार ८५२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली आहे. ()

राज्यात गेल्या सात महिन्यांपासून करोना संसर्गानं थैमान घातला आहे. करोनावर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. प्रशासनाकडून अनेक उपाययोजनादेखील राबवल्या जात आहेत. त्यामुळं करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास आता यश येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाचे रुग्ण घटताना दिसत आहेत तसंच, करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही कमी होताना दिसत आहे.

आज राज्यानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार नवीन बाधित रुग्णसंख्या आणि रुग्ण बरे होण्याची संख्या यांच्यात मोठा फरक दिसून येत आहे. राज्यात आज ८ हजार १४२ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, २३ हजार ३७१ जणांनी करोनावर यशस्वी मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात एकूण १४ लाख १५ हजार ६७९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यू दर २. ६४ टक्के इतका झाला आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८३,२७,४९३ चाचण्यांपैकी १६,१७,६५८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, सध्या राज्यात २४,४७,२९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २३ हजार ३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here