रांजणगाव येथील बायोटेक कंपनीत हे तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून ही कंपनी सील केली आहे. या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सहा पथके स्थापन केली होती. या पथकांनी तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक केली. तर आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. ज्या बायोटेक कंपनीत मेफेड्रोन तयार केले गेले, तेथील मशीनसह कंपनी सील करण्यात आली आहे.
पुण्यात ६२ हजारांचे जप्त
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका व्यक्तीने एमडी विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर, खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, ६१ हजार ८५० रुपये किंमतीचा १२ ग्रॅम ३७० मिली ग्रॅम एमडी असल्याचे आढळून आले. या व्यक्तीला अटक करून त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times