पाटणाः बिहार निवडणुकीचा पाया आपण गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतच रचला होता, असं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) नेते यांनी सांगितलं. ते बेगुसरायमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी बेगुसराय जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी केली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडी चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या मुलाखतीत कन्हैय्या कुमार यांनी बिहारमधील राजकारणाच्या प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे भाष्य केलं आहे.

प्रश्नः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसरायमध्ये झालेल्या पराभवाच्या तुलनेत २०२० च्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडेल का?

कन्हैय्या कुमार: लोकशाहीत माझ्या मते पराभव आणि विजय होतच असतात. लोकशाहीच्या इतिहासात बड्या नेत्यांचा निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे. मला असं वाटतं की, पराभव होणं आणि जिंकणं यापेक्षा लढा देणं अधिक महत्त्वाचं आहे. लढण्याची सवय राहिली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मी पराभवापेक्षा जास्त बेगूसरायमधून मी कसा लढलो हे मला आठवतं. लोकसभा निवडणुकांच्या वेळी आम्हाला बेगुसरायमध्ये दुहेरी लढाई लढवावी लागली. एका बाजूला भाजप + जेडीयू + एलजेपी आणि दुसर्‍या बाजूला आरजेडी + कॉंग्रेस होती. तरीही लढलो, जवळपास ३ लाख मते आम्हाला मिळाली. आम्ही आमचे निवडणूक डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचवले. आम्ही बेगुसरायमधील ७ पैकी ५ विधानसभेच्या जागांवर दुसऱ्या क्रमांकांवर होतो. बिहारी भाषेत, सांगायचे तर त्यावेळी आम्ही दही बनवण्यासाठी विरजण घातलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत दही तयार होत आहे. बेगुसराय जिल्ह्यातील विधानसभेच्या ७ जागांपैकी ४ जागांवर निवडणूक डावे पक्ष निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रीय जनता दल (RJD) २ आणि कॉंग्रेस १ जागा लढवत आहे.

प्रश्नः लोकसभा निवडणुकीवेळी तुम्ही आरजेडीच्या तन्वीर हसनविरोधात निवडणूक लढवली होती. पण विधानसभा निवडणुकीत तुम्ही एकत्र आलात. मग परिस्थिती बदलली आहे का?

कन्हैय्या कुमार: लोकसभा निवडणुकीत मी केलेला प्रचार आणि जाहीरसभा पाहिल्या तर आमची लढाई कोणत्याही लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी शक्तींशी नाही. आमची लढाई ही देशाच्या मूल्ये सामाजिक न्याय, सामाजिक ऐक्य, धर्मनिरपेक्षता, सामाजिक सौहार्दाविरूद्ध असलेल्या शक्तींविरूद्ध आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत तन्वीरजी आणि आरजेडी विरोधात कधीही बोललो नाही. कॉंग्रेसविरूद्धही बोललो नाही. मुकेश साहनी, जीतन राम मांझी किंवा उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधात काहीही बोललो नाही. आमची लढाई स्पष्ट आहे. राजकारण हे नेत्यावर नव्हे तर निती केंद्रीत असली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. नितीवर आधारित राजकारणाचे सकारात्म परिणाम आम्हाला काही प्रमाणात मिळू लागले आहेत. जाहीरनाम्यातून आम्ही राष्ट्रकवी दिनकर यांच्या नावाने राष्ट्रीय विद्यापीठ तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे नेते जोरदारपणे आपली बाजू मांडत आहेत. पण ‘कबीरा खड़ा बाजार में, मांगे सबकी खैर । ना काहू से दोस्ती – ना ही किसीसे बैर’, असं आमचं धोरण आहे.

प्रश्नः भाजप विचार न करता नितीशकुमारांबद्दल तुमचं काय मत आहे? किंवा भाजप आणि नितीश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं तुम्हाला वाटतं?

कन्हैय्या कुमार: अशा विश्लेषणावर किंवा विचारावर माझा कधीच विश्वास नाही. कुठलाही नेत्याचा किंवा पक्षाचा कार्यकाळ हा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटमध्ये बघितला जाऊ नये. जेव्हा आपण समाजाचे समालोचनात्मक विश्लेषण करता तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या आत काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट घडतं. नितीशजी मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर बिहारची जनता त्यांच्याकडे बदला आपेक्षेने बघत होती. सुरुवातीच्या काळात नितीश यांनी केलेल्या काही कामाचं कौतुकही काही जणांनी केलं. पण आजच्या घडीला बिहारची जनता नितीशजींना कंटाळली आहे. हा फक्त माझा मुद्दा नाही. जेव्हा आपण बिहारच्या रस्त्यावर फिरता, नागरिकांशी बोलता त्यानंतर हे दिसून येतं. जनता नितीशकुमारवर खूप नाराज आहे. नितीश यांच्यासोबत भाजपही १५ वर्षे सत्तेत आहे. यामुळे फक्त नितीशजींवर टीका न करता सुशील कुमार मोदींनाही सवाल केले पाहिजेत. भाजप चलाकीने सर्व अपयश नितीशकुमार यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. यातून भाजप आपलं अपयश आणि जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नात आहे. याचं एक उदाहरण देतो. करोना कालावधीत हजारो स्थलांतरित मजूर आणि कामगारांनी पायी चालत बिहार गाठलं. पण त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था केली गेली नाही. जे आजारी पडले त्यांचे रुग्णालयात वाईट हाल झाले होते. राज्याचे आरोग्यमंत्री हे भाजपचे मंगल पांडे आहेत. मग हा प्रश्न त्यांना का विचारू नये? राज्यातील मुद्दे तोलून मापून उपस्थित केले जात आहेत. मुख्य प्रश्नांपासून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रश्नः भाजप नितीशकुमार यांना पुढे करून आपल्या उणीवा लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं तुम्हाला वाटतं का?

कन्हैय्या कुमार: हे तर आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून पाहातोय. जे काही चांगलं घडतंय ते मोदीजीचं आणि जे काही वाईट ते नितीशकुमारांचं. जर आपण एखाद्या सरकारवर राजकीय टीका केली तर त्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. ही एलजेपीची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. कारण ती ही एनडीएचाच एक भाग आहे. बिहारमधील जनतेला राजकारणात मोठा रस आहे. देशाच्या कोणत्याही भागात जा, नागरिक मोकळेपणाने बोलतात. रिक्षाचालक, चहा विक्रेता, ट्रेन, बस असो किंवा कुठेही असो, बिहारमध्ये राजकारणावर जोरदार चर्चा होते. यात राजकीय मुद्दा उपस्थित होतात. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जी काही खेळी करत आहे आणि बिहारमधील जनते हे समजतेय. बिहारची जनता निश्चितपणे याला उत्तर देईल, असं कन्हैय्या कुमार म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here