लखनऊ:
राजस्थानातल्या जयपूरमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडवल्याप्रकरणी दोषी डॉ. या दहशतवाद्याच्या मुसक्या पोलिसांना कानपूरमध्ये आवळल्या. त्याला आता कानपूरमधून लखनऊला आणण्यात आलं आहे. तो उत्तरप्रदेश मार्गे नेपाळला पळण्याच्या तयारीत होता. कानपूरमध्ये एका मशिदीतून बाहेर पडत असताना त्याला अटक करण्यात आली. पॅरोलवर मुंबईत असताना त्याने पोबारा केला होता.

अन्सारीवर घातपात केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तो अजमेर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्या नावावर देशातल्या वेगवेगळ्या भागात तब्बल ५० हून अधिक बॉम्बस्फोट घडवल्याचे आरोप आहेत. पेशाने तो डॉक्टर आहे. त्यामुळे त्याला ‘डॉ. बॉम्ब’ म्हटलं जाऊ लागलं.

सध्या लखनऊमध्ये एटीएस त्याची चौकशी करत आहे. सर्वात आधी अन्सारीला राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली होती. राजस्थानात पाच वेगवेगळ्या ठिकाणी ५ आणि ६ डिसेंबर १९९३ ला बॉम्बस्फोट झाले. त्याचा सूत्रधार अन्सारी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला जन्मठेप सुनावण्यात आली.


डॉ. बॉम्बकडे सापडले हजारो रुपये

जालीस अन्सारीला अटक केली, तेव्हा त्याच्याकडून ४७,७८० रुपये, एक पॉकेट डायरी, मोबाइल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले. टाइम बॉम्ब आणि टीएनटीला डिटोनेट करण्यात जालीस अन्सारीचा हात कोणी धरू शकत नाही, असं म्हटलं जातं.

नमाजासाठी बाहेर पडला आणि पसार झाला

अन्सारी मुंबईतून फरार झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क करण्यात आलं होतं. अन्सारी मूळ मुंबईचा आहे. त्याला राजस्थानमधील अजमेर सेंट्रल जेलने २१ दिवसांच्या पॅरोलवर सोडलं होतं. तो शुक्रवारी सरेंडर करणार होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की पॅरोलदरम्यान अन्सारी रोज सकाळी १०.३० ते १२ च्या दरम्यान, मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावायचा. गुरुवारी तो आला नाही. दुपारी अन्सारीचा ३५ वर्षीय मुलगा जेद अन्सारी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. घरी नमाज अदा करायला जातो सांगून अन्सारी गायब झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here