पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार घोषणा दिल्या जातात. पण बुधवारी एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांच्या प्रचारसभेत लालू ‘यादव जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. हे बघून नितीशकुमार संतापल्याचं दिसतंय. बराच काळ राष्ट्रीय जनता दलात असलेल्या चंद्रिका राय हे जेडीयूमध्ये दाखल झाले. चंदिका राय हे आता जेडियूचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नितीशकुमार आले होते. यावेळी नितीशकुमार यांनी आपलं भाषणमध्येच थांबवलं. ‘या काय घोषणा दिल्या जात? हे काय बोलत आहात?’ असं नितीशकुमार म्हणाले. जो कोणी हा मूर्खपणा करतोय त्याने हात वर करावे, असं ते म्हणताच सभेत शांतता पसरली. तेवढ्यात कोणीतरी ‘चारा चोर’. या घोटाळ्यातील आरोपावरून लालू यादव यांना तुरुंगात जावं लागलं.

यानंतर नितीशकुमार शांत होतील, असं वाटलं. पण ते थांबले नाहीत “इथे गोंधळ घालू नका. मला मत द्यायचं नसेल तर नका देऊ. पण तुम्ही ज्याच्यासाठी आलात त्या व्यक्तीची मतं नष्ट कराल, असं नितीशकुमार म्हणाले.

तेजस्वी यादव यांनी सत्ता आल्यास १० लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन दिलंय. या आश्वासनामुळे त्यांच्या मेळाव्यात मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांची झोप उडाल्याचं दिसतंय.

मंगळवारी नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्या निवडणूक रॅलीतील दाव्याची खिल्ली उडविताना म्हटले होते की, पृथ्वीवरील कोणीही हे अशक्य वचन पूर्ण करू शकत नाही.

मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना निवडणूक प्रचारादरम्यान जनतेचा रोषाला सामना करावा लागतोय, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण यात विशेष काहीही नसल्याचं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे स्थलांतरी मजूर आणि कामगारांसाठी नितीशकुमार यांच्यावर टीका होतेय. खासकरुन करोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात ३२ लाखाहून अधिक स्थलांतरित मजूर आणि कामगारांना बिहारमध्ये परतावं लागलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here