मुंबई: अभिनेत्री आणि तिची बहिण हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघींनाही आज समन्स बजावले आहे. दाखल गुन्ह्यात कंगनाला सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी तर रंगोली हिला मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ( , Sister Summoned By )

वाचा:

कंगना व तिच्या बहिणीविरुद्ध मुंबई पोलिसांकडून १२४ अ () यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी या दोघींना बोलावण्यात आले आहे. आज याबाबत समन्स बजावण्यात आले असून दोघींनाही प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

वाचा:

दरम्यान, हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांत परस्परांविषयी द्वेष उत्पन्न होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट करत असल्याच्या आरोपांप्रकरणी कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंडेल हिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी दिले होते. बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर यांनी अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली असता त्यावर हे आदेश दिले गेले होते. न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्याच दिवशी कंगना व रंगोली यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा:

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय?

न्यायालयात कंगनाच्या आक्षेपार्ह ट्वीटचा तपशील सादर करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधूंची जमावाने हत्या केली होती. त्यानंतर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते. मुंबई पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले तेव्हाही ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत तिने ट्वीट केले होते. बॉलीवूडची बदनामी करणाऱ्या अनेक वादग्रस्त ट्वीटची मालिकाच तिने लावली आहे. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावरही कंगनाने ट्वीटरच्या माध्यमातूनच टीका केली होती. ‘माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही’, असे ट्वीट करत कंगनाने महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here