म.टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘करोनाच्या विषाणूंपासून संरक्षण देणारे उत्पादन’, अशा जाहिराती यापुढे बंद होणार आहेत. करोनासंबंधी अशाप्रकारे जाहिराती दाखवताना किंवा प्रकाशित करताना सावधगिरी बाळगावी, असा कडक इशारा भारतीय जाहिरात मानांकन परिषदेने (एएससीआय) दिला आहे. यासंदर्भात मुंबई ग्राहक पंचायतकडून लढा देण्यात आला होता.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ग्राहकांची कमकुवत मानसिकता लक्षात घेऊन साबणांपासून ते चक्क गाद्या व भिंतीला लावायचे रंगसुद्धा ‘करोनारोधक’ कसे आहेत हे सांगणाऱ्या जाहिराती अनेकदा दिसून आल्या आहेत. याचा मुंबई ग्राहक पंचायतने विरोध केला होता. एएससीआयकडे वेळोवळी हा विषय ग्राहक पंचायतने उचलला. त्यानंतर आता त्यासंबंधी परिषदेने इशारा दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here