नागपूरः नागपूर जिल्ह्यातील गावाजवळ रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतकांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांकडून या अपघाताबाबत माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटीबोरी गावाजवळील भागात तीन जण रेल्वेचे रूळ ओलांडत होते. रेल्वेरूळ ओलांडताना दोन्ही रुळांवरून एकदम गाड्या आल्या. या तिघांना काय करावे, ते समजले नाही आणि घाबरलेले तिघे जण एका रेल्वेखाली आले. या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेल्वे अपघातात ठार झालेल्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे तिघे जण आहेत आणि गोदावरी नगर परिसरातील कारखान्यात कामाला होते, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times