पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रचार अभियान जोरात सुरू आहे. मात्र, या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षासाठी काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बिहारमधील दोन मोठे नेते, आणि यांना करोनाची लागण झाली आहे. इतकेच नाही, तर उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांची देखील तब्येत ठीक नाही. या दोघांचे करोनाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र, तरीही त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मोदी घेणार एकूण १२ सभा

दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि जनता दल संयुक्तने आपला निवडणूक प्रचार अभियानाला गती दिली आहे. भाजपते राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाझ हुसेन हे प्रचारासापासून दूर असले तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenndra Modi) लवकरच आता बिहारच्या रणमैदानात उतरत आहेत. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये एकूण १२ सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नीतीश कुमारांसह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते या प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा २३ ऑक्टोबरला सासाराम, गया आणि भागलपूर येथे होतील. तसेच २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्याला सभा होत आहेत. तसेच १ नोव्हेंबर या दिवशी छपरा, पूर्व चंपारण आणि तिसरी सभा समस्तीपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. पश्चिम चंपारण, सहरसा, अररियाच्या फरबिसगंज येथे ३ नोव्हेंबरला उर्वरित सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

वाचा-

करोना संकटाच्या या काळात तीन टप्प्यांमध्ये होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणूक निकालाची घोषणा १० नोव्हेंबर २०२० या दिवशी केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी मतदान होत आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर मतदान घेतले जाईल. या व्यतिरिक्त तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यांमधील ७८ जागांवर मतदान घेतले जाणार आहे.

वाचा-वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here