नवी दिल्ली : भारतानं गुरुवारी पहाटे सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठं यश मिळवलंय. राजस्थानच्या भागात ‘नाग’ या अॅन्टी टँक मार्गदर्शक क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडलीय. या क्षेपणास्राची चाचणी वॉरहेडसहीत करण्यात आली.

(DRDO) द्वारे निर्मित या देशी क्षेपणास्राची चाचणी पोखरणमध्ये गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे. तसंच या पद्धतीच्या मिसाईलध्ये भारताद्वारे निर्मित थर्ड जनरेशनची आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारेकडून या मिसाईलची वेगवेगळी ट्रायल घेतली जाते. यापूर्वीही ‘नाग’ क्षेपणास्राचे अनेक ट्रायल्स घेतले गेले आहेत. वर्ष २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या नाग क्षेपणास्रांची चाचणी पार पडलीय.

या क्षेपणास्रांची महती म्हणजे, अचूक निशाणा लावण्याची क्षमता तसंच शत्रूचा टँकही नेस्तनाबूत करण्याची क्षमता… खुद्द वजनात मात्र हे क्षेपणास्र इतर क्षेपणास्राच्या मानानं खूपच हलकं आहे.

‘नाग’ क्षेपणास्राच्या मदतीनं शत्रूच्या टँकसहीत इतर सैन्य वाहनांना काही सेकंदात धुळीत मिळवता येणं शक्य आहे. या मध्यम आणि लहान रेंजच्या मिसाईल असतात. त्यामुळे फायटर जेट, वॉर शिप, यांच्यासहीत इतर अनेक संसाधनांसहीत ही क्षेपणास्र जोडली जाऊ शकतात.

उल्लेखनीय म्हणजे, भारत – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून गेल्या महिनाभरता वेगवेगळ्या पद्धतीच्या अर्ध्या डझनहून अधिक स्वदेशी क्षेपणास्रांची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here